मुंडेंकडे होतं एक काम- उदयनराजे, udayanraje meet mahayuti leaders

मुंडेंकडे होतं एक काम- उदयनराजे

मुंडेंकडे होतं एक काम- उदयनराजे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उदयनराजे महायुतीच्या वाटेवर आहेत. त्यांनी मुंबईत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंची भेट घेतली. या भेटीनंतर ते खडसेंना भेटले आणि नंतर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ते रामदास आठवलेंना भेटणार आहेत. उदयनराजे यांच्या भेटीच्या कार्यक्रमामुळे ते राष्ट्रवादीला दणका देण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सुरूवातीला उदयनराजे भोसले यांनी मुंबईत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे यांनी सांगितले की, राजकारणापेक्षा मैत्री महत्वाची आहे. माझे मुंडे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यांच्याकडे एक काम होतं. त्यामुळे मी भेटायला आलो. यात राजकीय भेट असल्याचे कोणी समजण्याचं कारण नाही, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

या भेटीनंतर त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. सध्या ते उदयनराजे मातोश्रीकडे रवाना झाले असून या भेटीनंतर ते आठवले यांची भेट घेणार आहे. त्यामुळे उदयनराजे महायुतीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 17, 2013, 13:51


comments powered by Disqus