शिवाजी पार्कच का? भेंडीबाजार का नाही? Uddhav meets CM regarding Shivaji Park

शिवाजी पार्कच का? भेंडीबाजार का नाही?- उद्धव

शिवाजी पार्कच का? भेंडीबाजार का नाही?- उद्धव

www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसर आणि निवासी भागाला हेरिटेज दर्जा देण्याप्रकरणी हेरीटेजचा दर्जा मराठी वसाहतींनाच का? असा सवाल उद्धव यांनी केला आहे. शिवाजी पार्क परिसर हेरिटेज झाल्यास त्याचा फटका या भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला बसणार आहे.

शिवाजी पार्क परिसराला हेरिटेज दर्जा दिल्यास मोडकळीस आल्यावरही रहिवाशांना या परिसरातील घरांची पुनर्बांधणी करता येणार नाही, रंग काम करता येणार नाही याविषयी रहिवाशांकडून निषेध व्यक्त होत आहे.

शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या लोकांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्यासाठी उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घतली. या भेटीत उध्दव यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न उपस्थित केलेत. हेरिटेजचा दर्जा मराठी वसाहतींनाच का? बीडीडी चाळ, शिवाजी पार्क यांचीच निवड का केली? भेंडीबाजारला का वगळलं ? असा सवाल त्यांनी केलाय.

मराठी वसाहतींना वगळण्याची मागणी उद्धव यांनी केली. मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचंही उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. महत्वाचं म्हणजे मनसेचाही हेरिटेज दर्जाला विरोध आहे. शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनीही याला विरोध केला आहे.

First Published: Sunday, September 2, 2012, 11:33


comments powered by Disqus