पाक PMला झिडकाणाऱ्या मौलानाला भारतरत्न द्या- उद्धव, Uddhav Thackeray Ajmer Shrine Diwan Should Get Bharat Ratna

पाक PMला झिडकाणाऱ्या मौलानाला भारतरत्न द्या- उद्धव

पाक PMला झिडकाणाऱ्या मौलानाला भारतरत्न द्या- उद्धव
www.24taas.com, मुंबई

पाकिस्तानचे पंतप्रधान परवेझ अशरफच्या अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याला भेट देण्याच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या दर्ग्याचे दिवाण जैनुल अबेदीन अली यांच्या भूमिकेची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रशंसा केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मध्ये लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे की, जैनुल यांची देशभक्तीची भावना आणि त्यांचे देश प्रेम यामुळे त्यांनी दाखवून दिले आहे की, ते देशाचे खऱे रत्न आहेत, आणि त्यांना भारतरत्न हा सर्वात मोठा नागरी सन्मान द्यायला हवा.

पाक पीएमची धार्मिक यात्रा, भारतीय जवानांचा अपमान

खान यांचे साहस आणि मानवीय पुढाकाराची स्तुती करताना उद्धव म्हणाले, खान यांना वाटले असेल की, पाक पंतप्रधानांची धार्मिक यात्रा ही भारतीय जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. त्यामुळे त्यांनी या भेटीचा विरोध केला असेल. गेल्या महिन्यात पाक सैनिकांनी भारतीय सैनिकांची निघृण हत्या केली होती.

First Published: Monday, March 11, 2013, 17:12


comments powered by Disqus