शस्त्रक्रिया यशस्वी, उद्धवांचा हॉस्पीटलमध्ये मुक्काम, Uddhav Thackeray at Lilavati for angioplasty

शस्त्रक्रिया यशस्वी, उद्धवांचा हॉस्पीटलमध्ये मुक्काम

शस्त्रक्रिया यशस्वी, उद्धवांचा हॉस्पीटलमध्ये मुक्काम
www.24taas.com, मुंबई

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर आज मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज सकाळीच उद्धव ठाकरे तपासणीसाठी लीलावतीमध्ये दाखल झाले होते.

तपासणीनंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उद्धव यांच्या भेटीसाठी लीलावतीमध्ये दाखल झाले. जुलैमध्ये त्यांच्यावर पहिली अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

या तपासणीच्या निमित्तानं पुढचे तीन दिवस त्यांचा मुक्काम लीलावती रुग्णालयात असण्याची शक्यताय. उद्धव ठाकरेंवर झालेल्या पहिल्या अँजिओप्लास्टीवेळी राज ठाकरे हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. यावेळी ते पस्थित राहणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र उद्धव यांना लीलावतीमध्ये दाखल केल्यानंतर काहीवेळातच ते लीलावतीत दाखल झाले.

गेल्या एंजिओप्लास्टीवेळी राज ठाकरे आपले राजकीय मतभेद बाजुला ठेऊन उद्धव यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले होते. ते स्वत: एंजिओप्लास्टीवेऴी हॉस्पिटलमध्ये उभे होते.

First Published: Sunday, November 4, 2012, 13:11


comments powered by Disqus