उद्धव ठाकरे यांनी दिले मुख्यमंत्री होण्याचे संकेत, uddhav thackeray gives sign to became CM

उद्धव ठाकरे यांनी दिले मुख्यमंत्री होण्याचे संकेत

उद्धव ठाकरे यांनी दिले मुख्यमंत्री होण्याचे संकेत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मला तुम्ही मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या, मी मुख्यमंत्री होईल नाही होणार ही पुढची गोष्ट आहे. पण माझ्यावर तुम्ही जो विश्वास दाखविला तो खूप महत्त्वाचा आहे. असे सांगून आपणही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

३० मे रोजी राज ठाकरे यांनी सभा घेऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्याच्या जनतेने मनसेला कौल दिला तर राज्याचे नेतृत्त्व मी करेल असे राज ठाकरे यांनी सांगितले होते.

त्यावर उद्धव ठाकरे यांनाही शिवसैनिकांनी आणि इतर जणांनी मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर आयएमसी येथील एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला तुम्ही मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

त्याचा मला आनंद आहे. मी मुख्यमंत्री होईल ना होईल ही पुढची गोष्ट आहे. पण माझ्यावर तुम्ही जो विश्वास दाखविला ते खूप महत्त्वाचे आहे. मी तुमची कामे करू शकतो असा तुम्हांला विश्वास वाटतो हे खूप मोठे आहे. काम करणारा माणसाचे सरकार येणार आहे, असा विश्वास दाखविल्याबदल उद्धव ठाकरे यांनी आभार मानले.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 9, 2014, 18:49


comments powered by Disqus