Last Updated: Friday, November 30, 2012, 18:28
www.24taas.com, मुंबईशिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे येत्या 3 डिसेंबरपासून राज्याच्या दौ-यावर निघणार आहेत. पंधरा दिवस ते राज्यभर फिरणार आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. हा 15 दिवसांचा हा दौरा असणार आहे. दौऱ्यात ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.
या दौ-याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेना नेत्यांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली. येत्या हिवाळी आधिवेशनात शिवसेनेची काय भूमिका असेल, यावर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करतील.
First Published: Friday, November 30, 2012, 18:28