उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती बिघडली - राणे, uddhav thackeray vs narayan rane

उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती बिघडली - राणे

उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती बिघडली - राणे
www.24taas.com,झी मीडिया,मुंबई

शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती बिघडली असल्याने त्यांनी आपल्यावर आरोप केल्याची घणाघाती टीका उद्योगमंत्री नारायण राणेंनी केलीय.

कुडाळमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राणे बोलत होते. शिवसेना आणि शिवसेनेचे आमदार कोकणच्या मुळावर उठले असून शिवसेनेचे आमदार भयभीत आणि बेजार झाल्याचीही टीका राणेंनी केली.

तसंच ते इतर पक्षात जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राणेंनी केला. उद्धव ठाकरेंच्या सभेला इतर ठिकाणांवरुन लोकं जमवण्यात आली होती. तसंच जिल्ह्यातील फक्त 5 टक्के लोक सभेला जमले असल्याचंही राणे म्हणाले.

First Published: Tuesday, April 30, 2013, 18:49


comments powered by Disqus