Last Updated: Monday, October 28, 2013, 13:01
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराहुल गांधींनी इंदूरच्या सभेत मुजफ्फरनगर संदर्भात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य योग्यच आहे, असा चिमटा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलाय. त्याबरोबरच या विधानाला विरोध करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अन्य भाजप नेत्यांनाही टोलेबाजी करण्यात आलीये.
इंदूरच्या सभेत त्यांनी मुझफ्फरनगर दंगलीवरून केलेल्या विधानांवर इतका गदारोळ माजविण्याचं कारण काय? काँग्रेसचे युवराज अजाणतेपणे सत्य बोलून गेले आहेत. राहुल गांधी यांनी सांगितलं, ‘‘मुझफ्फरनगरच्या दंगलीत आयएसआयचा हात आहे आणि दंगलीच्या झळा बसलेले मुसलमान युवक आयएसआयच्या संपर्कात आहेत.’’ युवराजांनी या देशातील धर्मांध मुसलमानांच्या बाबतीत जे सत्य सांगितलं आहे, त्यात धक्का बसावे असं काही नाही. आयएसआय व धर्मांध मुसलमानांविषयी युवराजांनी मांडलेले विचार नवीन नाहीत, असं सामनामध्ये मांडण्यात आलंय.
राहुल गांधींना कौतुकास्पद चिमटा काढत उद्धव ठाकरेंनी मोदींना टोला लगावलाय, “आज ‘युवराज’ राहुल मुझफ्फरनगरच्या दंगलीबाबत तीच भूमिका मांडत आहेत. ते चुकून खरे बोलले आहेत. म्हणून त्यांना झोडपलेच पाहिजे असा नियम नाही.”, असं मोदींना शिवसेनेनं सुनावलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो
करा.पाहा व्हि़डिओ
First Published: Monday, October 28, 2013, 12:58