उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात , Udhhav Thackera`s angioplasty

उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात

उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात
www.24taas.com, मुंबई

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज लीलावती रुग्णालयात तपासणी होणार आहे. ते लीलावतीत पोहोचले आहेत. त्यानंतर दुसरी अँजिओप्लास्टी करण्याबाबत निर्णय होईल.

जुलैमध्ये त्यांच्यावर पहिली अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. या तपासणीच्या निमित्तानं पुढले तीन दिवस त्यांचा मुक्काम लीलावती रुग्णालयात असण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंवर झालेल्या पहिल्या अँजिओप्लास्टीच्यावेळी राज ठाकरे हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. त्यामुळे यावेळीही राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. राज यांचा नियोजित दौरा पुण्यात असल्याने ते येण्याची शक्यता नव्हती. मात्र, राज ठाकरे यांनी तात्काळ मुंबईत दाखल झालेत. ते तडख लीलावतीत पोहोचलेत.

First Published: Sunday, November 4, 2012, 10:59


comments powered by Disqus