गारपीटग्रस्तांना मदत करण्यास अचडण - शरद पवार, Unable to help Garpitgrstanna - Sharad Pawar

गारपीटग्रस्तांना मदत करण्यास अचडण - शरद पवार

गारपीटग्रस्तांना मदत करण्यास अचडण - शरद पवार
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

गारपीटग्रस्तांना मदत उपलब्ध करून देण्यालाच प्राधान्य असल्याचं कृषीमंत्री शरद पवारांनी सांगितलंय. मात्र मदत करण्यामध्ये मुख्य अडचण आचारसंहितेचीच असल्याचं त्यांनी म्हटलंय.

यासंदर्भात उद्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार असून मदत सरकार नव्हे प्रशासन जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात १६ लाख हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालंय. मुख्यत: फळबागांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिलीय. महाराष्ट्रात यंदा ऊसाचं उत्पादन१५टक्क्यांनी घटण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

गारपिटीच्या या संकटाला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून काय फरक पडणार असा सवालही उपस्थित केला. गारपीटग्रस्तांनी आलेल्या संकटाला मोठ्या धाडसानं सामोरं जावं, आत्महत्या करू नये असं सांगत सरकार शेतक-यांच्या पाठिशी असल्याचं आश्वासन दिलं. तर पीककर्ज माफीचा निर्णय बँकांशी संबंधित असून सरकारच्या हाती काहीही नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.

First Published: Tuesday, March 18, 2014, 16:27


comments powered by Disqus