Last Updated: Wednesday, October 31, 2012, 13:15
www.24taas.com, मुंबईराज्यात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मुंबईतही बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईतील पायधुनी भागातील एका सार्वजनिक शौचालयाच्या गच्चीवर तिघांनी एका १४ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पायधुनी पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
मालवणी येथे राहणाऱ्या पि़डीत मुलीला तिच्या आईने डाळ आणण्यासाठी बाजारात पाठविले. त्याचवेळी याच परिसरात राहणार्या कालू याने तिला गाठले आणि आइस्क्रीम देण्याच्या बहाण्याने मालाड रेल्वे स्थानकावर घेऊन गेला.त्यानंतर तिला पी.डी. मेलो रोडवर असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या गच्चीवर दोन अल्पवयीन मित्र बसले होते. अब्दुल आणि त्या दोघांनी रहिमा हिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि मध्यरात्री दोनच्या सुमारास तिला सोडून दिले.
गस्तीवर असलेल्या पोलिसांना रहिमा एकटीच फिरताना दिसली. रहिमाने त्यांना सर्व हकिकत सांगितली. पोलिसांनी पळ काढणार्या अब्दुल आणि दोन मुलांना अटक केली. अब्दुलला पाच दिवसांची कोठडी सुनावली असून इतर दोघांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
First Published: Wednesday, October 31, 2012, 13:08