केंद्रीय मंत्री शुक्लाना अंधेरीत १०० कोटींचा भूखंड - सोमय्या, Union Minister Rajiv Shukla vs Kir

केंद्रीय मंत्री शुक्लाना अंधेरीत १०० कोटींचा भूखंड - सोमय्या

केंद्रीय मंत्री शुक्लाना अंधेरीत १०० कोटींचा भूखंड - सोमय्या
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

काँग्रेस नेते राहुल गांधींचे मित्र आणि केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या कंपनीला अंधेरी येथील सुमारे १०० कोटी रूपयांचा भूखंड दिल्याबाबतची फाइल मंत्रालयाच्या आगीत जळून खाक झाली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यानंच भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना ही धक्कादायक माहिती दिलीय. राजीव शुक्लांशी संबंधित भूखंडाची फाइल आगीत जळाल्याच्या सरकारच्या खुलाशामुळं संशयाचा धूर येतोय.

दरम्यान, ही फाइल जळालेली नसून, गायब करण्यात आलीय, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. तर मंत्रालयात जळालेल्या अनेक फायली पुन्हा बनवण्यात आल्यात. कदाचित ही फाइल देखील पुन्हा तयार केलेली असावी, असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सारवासारव केलीय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हि़डिओ

First Published: Friday, December 6, 2013, 20:27


comments powered by Disqus