वर्षा भोसलेंनी केला होता तीनदा आत्महत्येचा प्रयत्न, Varsha Bhosle had attempted suicide thrice before

वर्षा भोसलेंनी केला होता तीनदा आत्महत्येचा प्रयत्न

वर्षा भोसलेंनी केला होता तीनदा आत्महत्येचा प्रयत्न

www.24taas.com, मुंबई

वर्षा यांनी या आधी तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. १९९८ साली पती हेमंत केंकरे यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर वर्षा यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर २००८ सालीदेखील त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच यापूर्वी शेवटचा २०१०मध्येही असा प्रयत्न केला होता.

अनाथाश्रम सुरू करायचा होता!
वर्षा यांनी गौतम राजाध्यक्ष यांच्या मदतीने एक ट्रस्ट सुरू केला होता. दोघांना मिळून एक अनाथाश्रम सुरू करायचा होता, पण त्याआधीच राजाध्यक्ष यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनाथाश्रम सुरू करायची इच्छा अपुरीच राहिली. म्हणून वर्षा या अधिक तणावाखाली आल्या. पुणे येथील दोन डॉक्टरांकडे वर्षा यांचे उपचार सुरू होते.
आशाताईंच्या मुलाची चौकशी होणार
वर्षा भोसले यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस आशा भोसलेंच्या मुलाची चौकशी करणार आहेत. वर्षा यांनी रिव्हॉलवर मधून गोळी झाडली होती. ही रिव्हॉलवर त्यांचा भाऊ आनंद यांच्या नावावर नोंदविण्यात आली आहे. रिव्हॉलवर वर्षा यांच्या‍कडे कशी गेली, हा खरा प्रश्न आहे. आनंद यांच्याकडे रिव्हॉलवर नव्ह ती, तर त्यां नी ती हरिवल्याॉची तक्रार द्यायला हवी होती. आनंद यांना रिव्हॉलवर आईच्या घरी असल्याची माहिती होती का, माहिती असुनही त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती का दिली नाही, असे प्रश्नही पोलिसांपुढे आहेत. आनंद यांच्याकडून चूक झाल्यास त्यांच्यांवर कारवाई होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.

First Published: Tuesday, October 9, 2012, 19:27


comments powered by Disqus