वर्षा भोसले गेल्या होत्या नशेच्या आहारी, varsha bhosle suicide

वर्षा भोसले गेल्या होत्या नशेच्या आहारी

वर्षा भोसले गेल्या होत्या नशेच्या आहारी
www.24taas.com, मुंबई

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या कन्या वर्षा भोसले यांनी आत्महत्या केल्यानंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. खुद्द आशा भोसले यांनी त्याची कबूली दिली आहे. वर्षा भोसले याचं वागणं हे अत्यंत एक्कलकोंडी, मितभाषी असं होतं.

क्षुल्लक कारणावरून चिडचिड करणं, त्यांच्या रागीट स्वभावामुळे त्यांचे कुटुंबीय जवळ जाण्यास घाबरत, अशी माहिती आशाताईंनी आपल्या जबाबात दिली आहे. गेल्या काही कालावधीपासून वर्षा यांना दारू, सिगारेटचे व्यसन जडले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

आशाताईंना वर्षाची मानसिक स्थिती माहित असल्याने त्यांनी तिला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी सिंगापूरला जाण्यासाठी नकार दिला होता. मिफ्ता अँवॉर्डसाठी सिंगापूरला जाताना आशाताईंनी वर्षा यांना सोबत येण्याबाबत विचारले होते.

मात्र, वर्षा यांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगत त्यास नकार दिला होता. गाण्याच्या कार्यक्रमानिमित्त जेव्हा केव्हा बाहेर जाण्याची संधी मिळत असे, तेव्हा वर्षाला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न असे, असे आशाताईंनी म्हटले आहे.

First Published: Friday, October 12, 2012, 14:00


comments powered by Disqus