Last Updated: Sunday, January 13, 2013, 22:02
www.24taas.com,मुंबईमुंबईचे `हॉकी कॉप` म्हणून ओळखले जाणारे एसीपी वसंत ढोबळे यांच्या बदलीला मनसेनंही विरोध केलाय. दोन दिवसांपूर्वी अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईवेळी एका फेरीवाल्याचा ब्रेन हॅमरेजनं मृत्यू झाल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीये.
दरम्यान, शिवसेनेनंही ढोबळेंच्या बदलीला विरोध केलाय. एसीपी वसंत ढोबळे यांना परत वाकोल्यात आणण्यात यावं यासाठी वाकोल्यातील लोकांनी सह्यांची मोहीम राबवलीय. जवळपास सहा हजार लोकांनी सह्याकरून ढोबळे याची बदली रद्द करण्याची मागणी केलीय.
ढोबळेंच्या समर्थनात नागरिक रस्त्यावर उतरले आणि वाकोला पोलीस स्टेशनाला घेराव घालून ढोबळेंची बदली रद्द कऱण्याची मागणी केली आहे. मात्र पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये मदन जयस्वाल यांचा मृत्यू ब्रेन हॅम्रेजमुळे झाल्याचं उघड झालं आहे.
First Published: Sunday, January 13, 2013, 22:02