Last Updated: Tuesday, October 30, 2012, 10:48
www.24taas.com, मुंबईघर खरेदी केलेल्या आणि करु इच्छिणा-यांसाठी आज उच्च न्यायालयात महत्वपूर्ण निर्णय होणार आहे. घर खरेदी करताना त्यावर व्हॅट किती आकारावा याबाबत उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे.
तसंच व्हॅट आकारताना जमिनीची किंमत ही बाजारभावाप्रमाणे की रेडी रेकनरप्रमाणे धरायची याबाबतही निर्णय अपेक्षित आहे. तसंच व्हॅट फ्लॅटच्या एकूण बांधकाम खर्चावर आकारायचा की सदनिकेच्या एकूण खर्चावर आकारायचा याबाबतही निर्णय होणार आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे घर खरेदी करु इच्छिणा-यांचा संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे.
First Published: Tuesday, October 30, 2012, 10:48