Last Updated: Sunday, February 23, 2014, 20:58
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईस्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांचे रविवारी दुपारी एक वाजता निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी स्वामिनी, दोन मुलगे असा परिवार आहे.
सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक सदस्य आणि हिंदूमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूत ते काम पाहत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे आणि त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर यांचे सुपुत्र होत.
हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी देशभर अखंड हिंदुस्तान तसेच समान नागरी कायदा, आदीसाठी कार्य केले. मुंबई महानगर पालिकेत वंदे मातरम हे देशभक्ती गीत म्हणावे यासाठी मोर्चा काढला. तसेच विधानसभेत चर्चा घडवून आणली.
भिवंडी येथे शिवजयंती मिरवणूक निघावी, मलंग गडावरील बंदी दूर व्हावी यासाठी त्यांनी आंदोलन केले. हिंदुत्वासाठी राजकीय कृतीशील कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून ठाणे येथे सैनिक शाळा सुरू केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, February 23, 2014, 20:58