Last Updated: Friday, November 30, 2012, 10:01
www.24taas.com, मुंबई १९७१च्या पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या, एकेकाळी भारतीय नौदलाची शान असलेल्या आयएमएस विक्रांत या विमानवाहू युद्ध नौकेचे भवितव्य अंधारात आहे. नौदल आता ही युद्ध नौक भंगारात काढण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
१९९७ साली नौदलाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या या युद्ध नौकेचे म्युझियमध्ये रुपांतर करण्यात आले. मुंबईत नौदलाच्या डॉकमध्ये उभी असलेली ही युद्ध नौका समुद्राच्या पाण्यामुळे गंजत चालली आहे. आता ही युद्ध नौका दुरुस्तीच्या पलिकडे गेल्याचं नौदलाचं म्हणणं आहे. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणेच ‘नौदल दिन’ जवळ आला असतानासुद्धा विक्रांत सर्व सामान्यांकरीता खुले करण्यात आलेले नाहीत. कारण जास्त पर्यटकांना या युद्ध नौकेवर आणण्यासाठी धोक्याचं असल्याचं नौदलाचं म्हणणं आहे. या परिस्थितीला राज्य सरकारची अनाथासुद्धा जबाबदार असल्याचं नौदलाच्या सूत्रांचं म्हणणं आहे.
१९९७ पासून आत्तापर्यंत या युद्ध नौकेचं कायमस्वरुपी म्युझियम तयार करण्यात किंवा विक्रांतला नवीन जागा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे नौदलाच्या डॉकमध्ये विक्रांतला उभी करणं नौदालाला कठीण जात आहे. कारण २० हजार टन पेक्षा जास्त वजनाची विक्रांतमुळे जागा नाहक अडली जात आहे. अनेक युद्ध नौकांना तळाबाहेर उभे राहवे लागत आहे. त्यामुळेच नौदल दुरुस्तीपलीकडे गेलेल्या विक्रांतला भंगारात काढण्याचा विचार करत आहे.
First Published: Friday, November 30, 2012, 09:40