Last Updated: Thursday, November 29, 2012, 17:10
www.24taas.com, मुंबई श्वेतपत्रिका मांडल्यानंतर अजित पवारांचे कमबॅक म्हणजे अटकपूर्व जामीन घेण्याचाच प्रकार असल्याची टीका भाजप नेते विनोद तावडे यांनी केलीय. तसंच अजित पवारांनी निर्दोषत्व सिद्ध झाल्यानंतरच पुन्हा मंत्रिपद स्वीकारावं असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, श्वेतपत्रिका सादर होण्याआधीच राष्ट्रवादीनं अजितदादांना क्लीन चिट देण्याचा आटापिटा सुरू केलाय. राज्यातल्या सिंचन क्षेत्रात २८ टक्के वाढ झाली असून अजितदादांवरील आरोप तथ्यहीन असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. त्यामुळं अजितदादांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळात परत यावे, अशी मागणीही त्यांनी केलीय. सर्वात कमी दरानं कंत्राट महाराष्ट्रातच दिले गेल्याचा दावाही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय तर जोपर्यंत श्वेतपत्रिका निघत नाही तोपर्यंत काहीच बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिलीए.
First Published: Thursday, November 29, 2012, 17:05