मुंबईच्या रस्त्यांवर विंटेज कार्स Wintage cars on Mumbai Roads

मुंबईच्या रस्त्यांवर विंटेज कार्स

मुंबईच्या रस्त्यांवर विंटेज कार्स
www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या रस्त्यांवर रोज नवनव्या देशी-विदेशी कार्स फइरताना दिसतात. मात्र आज मुंबीकरांना मुंबईच्या रस्त्यावर वेगळंच दृश्य दिसलं. गाड्या तर फिरत होत्या. मात्र या नव्या, आत्याधुनिक कार्स नसून गेल्या जमान्यातील विंटेज कार्स होत्या.

आज विंटेज कार रॅलीने मुंबईकरांचं आणि कार शौकिनांचं चांगलंच मनोरंजन केलं. दक्षिण मुंबईत आयोजन करण्यात आलेल्या या रॅलीमध्ये अनेक विंटेज गाड्या तसंच 50 पेक्षा जास्त मोटरसायकल्सनी सहभाग घेतला होता. गेल्या 26 वर्षांपासून या रॅलीचं आयोजन करण्यात येतं. अनेक मान्यवर व्यक्ती मोठ्या काळजीपूर्वक सांभाळलेल्या आपल्या विंटेज कार घेऊन या रॅलीत सहभागी झाले होते.

फ्लोरा फाऊंटनपासून सुरु होऊन ही रॅली दादरच्या फाईव्ह गार्डनमध्ये संपली. अनेकांनी ही रॅली पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनीही हजेरी लावली होती.

First Published: Sunday, February 17, 2013, 18:04


comments powered by Disqus