'वाडिया'च्या कर्मचाऱ्यांची प्रीतीविरोधात पोलिसांत तक्रार, Wadia employee`s file case against preity

'वाडिया'च्या कर्मचाऱ्यांची प्रीतीविरोधात पोलिसांत तक्रार

'वाडिया'च्या कर्मचाऱ्यांची प्रीतीविरोधात पोलिसांत तक्रार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री प्रीती झिंटा हिनं नेस वाडिया विरोधात पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारी संबंधी अजून काहीही ठोस पुरावे मिळाले नसल्याचं समजतंय. त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे वाडिया हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि नेसचे समर्थकांनी 'खोटी तक्रार नोंदवणाऱ्या प्रीतीविरुद्धच कारवाई करण्याची' मागणी केलीय.

वाडिया हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांनी प्रीती विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. प्रितीनं केलेली ही तक्रार चुकीची असल्याचं सांगत 354 या कलमाचा तिनं चुकीचा उपयोग केल्याचा दावा, या नेस समर्थकांनी केलाय.

'मॅच दरम्यान एखादा संघ विजयी झाला की एकमेकांना मिठया मारल्या जातात, त्यात प्रीती ही मागे नसते, मग नुसता हात लावला तर छेडछाड केल्याचा गुन्हा कसा दाखल होतो' असा सवाल कर्मचाऱ्यांनी केलाय.

नेसविरुद्ध केलेल्या तक्रारीसंबंधी पोलिसांना काही पुरावे मिळाले नाहीत तसंच पोलीस त्यावेळी वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या लोकांशी बोलणार आहेत. मॅच सुरु असताना नेसनं चुकीचे वर्तन व सार्वजनिक ठिकाणी अपमानित केलं होतं, अशी तक्रार प्रीतीनं नोंदवलीय. परंतु बीसीसीआयकडून मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून मिळालेल्या फुटेजमध्ये नेस दोषी आहे असं दर्शवणारे काही ठोस पुरावे हाती लागले नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय. हा प्रकार घडला त्यावेळी उपस्थित असलेले कुटुंब, मित्र परिवार तसेच किंग्स ईलेवन पंजाबचे स्टाफ आणि खेळाडूंचे जबाबही यासंदर्भात नोंदविले जाणार आहेत.

सध्या प्रिती अमेरिकेला गेली असून सूत्रांच्या सांगण्यानूसार, ती लॉस एन्जेलिसला एक महिना राहणार आहे. ठोस पुरावा हाती लागल्याशिवाय नेसला अटक होणार नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.


सैफ म्हणाला नेस जेंटलमन...
बॉलिवूड अभिनेता आणि प्रीतीसोबत अनेक चित्रपटांमध्ये सहकलाकार राहिलेल्या सैफ अली खान यानं 'प्रीती आणि नेस दोघेही माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्यातील घटनाक्रमामुळे मी दुःखी आहे' असं म्हटलंय.

'नेस आणि मी एकाच शाळेत होतो. मी त्याला चांगले ओळखतो. तो एक चांगला व्यक्ती आहे. मला विश्वास आहे, त्यांच्यामधील वाद लवकरच मिटतील` अशी प्रतिक्रिया त्यानं व्यक्त केलीय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 16, 2014, 21:35


comments powered by Disqus