२०१३ सालात होऊ शकते पगारात वाढ!, wage revision in 2013

२०१३ सालात होऊ शकते पगारात वाढ!

२०१३ सालात होऊ शकते पगारात वाढ!
www.24taas.com, मुंबई

आर्थिक मंदीच्या कारणास्तव कित्येक कंपन्यांचं ‘वेज रिव्हिजन’ अर्थात वेतनवाढ गेल्या काही काळापासून रखडलंय. पण, हे वर्ष मात्र अनेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खुशखबर देणारं वर्ष ठरण्याची शक्यता आहे. २०१३ साली अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात सुतोवाच केलंय.

२०१३ हे वर्ष कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरणार अशी चिन्हं सध्या निर्माण झाली आहेत. शहरातल्या जवळपास सगळ्याच कंपन्यांमध्ये गेल्या वर्षापासूनच वेतनवाढ पुढे ढकलण्यात येतेय. पण, यावर्षी मात्र वेतनवाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांचे डोळे व्यवस्थापनाच्या निर्णयाकडे टिकून आहे. ‘वेज रिव्हिजन’ कसं होणार, कधी होणार, मंदीच्या या काळात कंपनीला लाभ होईल की नुकसान यांसारख्या अनेक विषयांवर मार्केटमध्ये जोरदार चर्चा दिसून येतेय. याचवेळेस कामगार युनियनवरदेखील दबाव वाढताना दिसतोय. युनियनचे लोकही रणनीती तयार करण्याच्या कामाला लागलेत. काही कंपन्यांमध्ये ‘चार्टर ऑफ डिमांडस्’ दाखल करण्यात आलेत तर काही ठिकाणी ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेण्यात आलीय.

प्रतिष्ठीत ‘टाटा मोटर्स’मध्ये एप्रिल २०१३ पासून ‘वेज रिव्हिजन’ प्रलंबित आहे. दरवर्षी या वेळेपर्यंत ‘चार्टर ऑफ डिमांडस’ पाठवलं जातं पण, यावर्षी मात्र युनियननं अजून कुठलंही धोरण जाहीर केलेलं नाही. वेतनवाढीसंदर्भात कर्मचाऱ्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असं टेल्को वर्कर्स युनियननं म्हटलंय. तर ‘टाटा स्टील’मध्ये मात्र चार्टर ऑफ डिमांडस पाठवण्यात आलंय. इथंही जानेवारी २०१२ पासून वेतनवाढ प्रलंबित आहे. युनियन व्यवस्थापनाशी चर्चा करण्याच्या तयारीत आहे. यंदा पेट्रोल अलाउन्सचीदेखील मागणी करण्यात येणार आहे.

First Published: Thursday, January 17, 2013, 08:44


comments powered by Disqus