मुंबईत चालत्या रेल्वेत तरूणीची छेडछाड, फेकण्याचा प्रयत्न, Waged a young woman in moving train in Mumbai

मुंबईत चालत्या रेल्वेत तरूणीची छेडछाड, फेकण्याचा प्रयत्न

मुंबईत चालत्या रेल्वेत तरूणीची छेडछाड, फेकण्याचा प्रयत्न
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत चालत्या रेल्वेमध्ये महिलांच्या डब्यात घुसून तरूणीची छेडछाड करण्याचा प्रकार आज पहाटे ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडला. तरूणींने जोरदार आरडाओरडा केल्याने अन्य प्रवासी मदतीसाठी धाऊन आलेत. दरम्यान, छेडछाडीनंतर या तरूणीला चालत्या ट्रेनमधून फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मध्य रेल्वेमार्गावर पिडीत तरूणी महालक्ष्मी ते माटूंगा असा करीत होती. पहाटे ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान रेल्वे महालक्ष्मी स्टेशनजवळ आली असताना एकजण महिला डब्यात घुसला. त्यांने महिलांना दरडावण्याचा प्रयत्न करीत एका तरूणीची छेडछाड केली. तिचे चुंबनही घेतले. यावेळी घाबरलेल्या तरूणीने जोरदार आरडाओरडा केला. त्यावेळी अन्य महिला सावध झाल्या. महिला पुढे येत असल्याचे पाहताच छेड काढणाऱ्यांने तरूणीला रेल्वेबाहेर फेकण्याचा प्रयत्न केला.

घाबरलेल्या तरूणीला वाचविण्यासाठी महिला सरसावल्या. त्याच दरम्यान तिला गाडीच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न छेडकाढणाऱ्यांने केला. यावेळी तरूणीने दरवाज्यातील दांडीला घट्ट पकडून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तिने आरडाओरडा केला. महिलेचा आवाज ऐकल्यानंतर अन्य डब्ब्यातील प्रवासी सावध झाले. त्यांनी प्रसंगसावधानाने छेडछाड करणाऱ्याला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.



दरम्यान, पिडीत तरूणीच्या घरी गाडीतील प्रवाशांनी फोन करून संपर्क साधला. त्यानंतर तिचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. या छेडछाडची तक्रार करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी छेडछाड करण्याला ताब्यात घेतले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, July 27, 2013, 11:00


comments powered by Disqus