Last Updated: Sunday, October 20, 2013, 22:16
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबईतील चेंबूर भागात मंदिराची भिंत पडून दोन लहान मुलांचा मृत्यू झालाय. रविवारी दुपारी साधारण: तीन वाजल्याच्या ही घटना घडलीय.
चेंबूरच्या खारदेव नगरमध्ये आचार्य मार्गवर विश्वेश्वर मंदिर आहे. या मंदिरासमोर एक पाच फुटाची भिंत होती. त्या भिंतीवर या मंदिराच्या विश्वस्तांच्या नावाची मोठी पाटी होती. इथेच काही मुलं खेळत होती. अचानक मंदिराच्या एका बाजुची भिंत कोसळली आणि विशाल वाघुडे हा अवघ्या आठ वर्षांचा मुलगा आणि अंजली म्हस्के ही सात वर्षांची मुलगी या भिंतीखाली सापडले.
उपचारासाठी त्यांनी पालिकेच्या शताब्दी रूग्णालयात दाखल केलं. पण, तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, October 20, 2013, 21:56