उद्या विदर्भ वेगळा करतील, म्हणून विरोध - उद्धव ठाकरे we against separate telangana - uddhav Thackera

उद्या विदर्भ वेगळा करतील, म्हणून विरोध - उद्धव ठाकरे

उद्या विदर्भ वेगळा करतील, म्हणून विरोध - उद्धव ठाकरे

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

स्वतंत्र तेलंगणाला शिवसेनेने विरोध केला आहे. तेलगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर भेट घेतली, यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

आज आंध्र प्रदेशाचे तुकडे करून तेलंगणा तयार करण्याचा प्रयत्न आहे, उद्या महाराष्ट्रातून विदर्भही वेगळा करतील, म्हणून आपला केंद्राच्या तोडा-फोडा भूमिकेला विरोध असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे आणि चंद्राबाबू नायडू यांच्यात बराच वेळ चर्चा झाली, त्यानंतर मातोश्रीत झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान तेलंगणाच्या मुद्यावर दिल्लीत संसदेचं कामकाज ठप्प झालं आहे.

काँग्रेसविरोधकांचं नेहमीच स्वागत असेल, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. चंद्राबाबू नायडू यांच्या रूपाने एनडीएला दक्षिण भारतात पाय रोवण्याच आणखी एक मोहरा मिळाला असल्याचंही सांगण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 5, 2014, 12:26


comments powered by Disqus