Last Updated: Tuesday, January 15, 2013, 22:42
www.24taas.com, मुंबई पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. येत्या ३१ मार्चपासून विरार-डहाणू रेल्वे मार्गावरील लोकल चर्चगेट ते डहाणूपर्यंत धावणार आहे.
याआधी डहाणूपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विरारहून दुसरी ट्रेन पकडून डहाणूला जावं लागत होतं. पण, आता या प्रवाशांचा हा ताण कमी होणार आहे. बदललेल्या ट्रेन मार्गांची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलीय. तसेच या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी शटल सेवाही सुरु करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नवीन लोकलचा समावेश करण्यात आल्यानं ही सेवा सुरु करण्यात आलीय. सुरुवातीला ही सेवा अत्यंत मर्यादीत स्वरुपात असणार आहे.
First Published: Tuesday, January 15, 2013, 22:42