शिक्षा दिली, आता फासावर कधी लटकवणार?, When hanged out kasab

शिक्षा दिली, आता फासावर कधी लटकवणार?

शिक्षा दिली, आता फासावर कधी लटकवणार?
www.24taas.com, मुंबई

कसाबच्या फाशीवर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र त्यांची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न आहे ? अफजल गुरूसारखी कसाबची शिक्षाही लांबणार नाही ना ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र कसाबला लवकरात लवकर फासावर लटकवावे अशी देशभरातून मागणी होत आहे.

२६/११ च्या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याची फाशी सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलीये. मुंबईतील विशेष कोर्ट आणि हायकोर्टानं कसाबला फाशी सुनावली होती. ही शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवली. जवळपास 10 महिने या खटल्याची सुनावणी सुरु होती.

सरकारी वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी खटल्याचं काम पाहिलं. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असताना न्यायमुर्तींनी आंतरराष्ट्रीय मानकांचं कुठंही उल्लघन होणार नाही याची दक्षता घेतली. कसाब दहशतवादी असतानाही कसाबला त्याची बाजू पूर्णपणं मांडण्याची संधी देण्यात आली. मात्र कसाबकडून करण्यात आलेला युक्तीवाद फेटाळण्यात आला.

दहशतवादी हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्याला फाशी मिळण्याची ही जगातली पहिली घटना आहे. त्यामुळं कसाबच्या खटल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरही महत्व आलं होतं.


First Published: Wednesday, August 29, 2012, 12:40


comments powered by Disqus