Last Updated: Wednesday, July 31, 2013, 14:31
www.24taas.com,झी मीडिया, मुंबईमुंबई महापालिकेने ऐतिहासिक कबुतरखाने बंद करण्याचा घाट घातलाय. कबुतरांमुळे अपघातांच्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेता पालिकेनं हा निर्णय घेतलाय.
दक्षिण मुंबईतील कबुतरखान्यांच्या जागा नेहमीच चर्चेत ठरल्यात. या कबुतर खान्यांना ऐतिहासीक दर्जाही मिळाला. मात्र कबुतरांची वाढती संख्या आणि त्यांचा ताप पादचारी आणि वाहनचालकांना होऊ लागलाय. कबुतर उडून अचानक मोटारसायकलसमोर आल्यानं तोल जाऊन पालिकेचे कनिष्ठ अभियंता एकनाथ जोंधळे यांचा दोन आठवड्यांपूर्वी मृत्यू झाल्याची घटना ग्रँटरोड येथील कबुतरखान्याजवळ घडली.
या घटनेची गंभीर दखल घेऊ मुंबईतील कबुतरखान्यांवर तारेचं कुंपण घालण्याची विनंतीही आपत्कालीन व्यवस्थापन खात्यानं वाहतूक पोलिसांना केली होती. कबुतरखान्यातील कबुतरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये दम्याचा विकारही बळावत चालल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे सभागृहाच्या पुढील बैठकीत हा मुद्दा चर्चेसाठी मांडण्यात येणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, July 31, 2013, 14:19