मुंबईतील महिलेच्या हत्याप्रकरणाचा उलगडा, woman dead in car

मुंबईतील महिलेच्या हत्याप्रकरणाचा उलगडा

मुंबईतील महिलेच्या हत्याप्रकरणाचा उलगडा
www.24taas.com,मुंबई

मुंबईतल्या वांद्रे परिसरात झालेल्या महिलेच्या हत्याप्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलयं. आयेशा शेख हिच्या हत्येप्रकरणी तिचा नवरा सलमान शेख याला पोलिसांनी अटक केलीये.

सलमान आणि त्याच्या तीन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केलीये. आयेशासह आपल्या कुटुंबाचं अपहरण करुन कारमध्ये कोंडल्याचा बनाव सलमाननं रचला होता. मात्र पोलिसांच्या जागरुकतेमुळं सलमानचं पितळ उघडं पडलयं.

मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकूल परिसरात एका बदं कारमध्ये एक कुटुंब बांधलेल्या अवस्थेत सापडलं होतं. कारमध्ये सापडलेल्या या कुटुंबातल्या महिलेचा मृत्यू झालाय. यशा शेख असं मृत महिलेचं नाव आहे.

तिचा पती सलमान शेख आणि दोन मुलांसोबत ते फिरायला म्हणून वांद्र्याच्या घरातून बाहेर पडले होते. काही वेळानंतर त्यांच्या नातेवाईकांना एक अज्ञाताचा फोन आला. त्यानं दिलेल्या माहितीनुसार बीकेसी परिसरातील पुलाशेजारी कारमध्ये कुटुंबीयांना बांधून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होते.

First Published: Monday, February 4, 2013, 15:02


comments powered by Disqus