नायगावात पत्नीकडून पतीचा खून woman killed her husband in vasai

नायगावात पत्नीकडून पतीचा खून

नायगावात पत्नीकडून पतीचा खून
www.24taas.com, झी मीडिया, वसई

वसईतील नायगावात अनैतिक संबंधातून पतीची हत्या झाल्याची घटना वसईतील पापडी येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.

३२ वर्षीय अबु ताहीर अजिज शेख , राहणार वाजामोहल्ला, पापडी मुळगांव, मोगरा, पं. बंगाल असे मयत इसमाचे नाव असून तो आपल्या पत्नी, मुलांसह या भागात वास्तव्यास होता. त्याची पत्नी त्रेसामतारा शेख हीचे तीचा मित्र प्रदिप याबरोबर प्रेमसंबंध होते.

त्यावरून अबु याचे अनेकदा भांडण झाले होते. वारंवारच्या या घटनेने व भांडणाचे परिवर्तन या घटनेत झाले. दोघांची मैत्री त्याला पसंत नसल्याने शुक्र. रात्री ११ च्या सुमारास झालेल्या भांडणातून पत्नी आणि तिचा मित्र यांनी दोघांनी मिळून धारदार शस्त्र, लाकडी दांड्याने अबु याला जबर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर प्रदीप अजुनही पेालिसांच्या ताब्यात सापडलेला नाही, तर त्रेसामतारा हिला अटक करण्यात आली. तीच्या सोबत अन्य एक संशयीत महिला ताब्यात घेण्यात आली.

घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांना कल्पना देऊनही घटनास्थळी पोलीस येत नसल्याने याबाबत स्थानिकांनी पोलीस अधिक्षकांना रात्री १२ वा. संपर्क साधला. त्यानंतर वसई पोलीस जागेवर पोहोचले. घटनेची नोंद वसई पोलीस ठाण्यात झाली असून उर्वरित आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास पो. उपनिरीक्षक अनिल अंधेरे करीत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 13, 2014, 19:51


comments powered by Disqus