मुंबईत ५८ वर्षांच्या महिलेवर बलात्कार, woman rape in Santacruz, Mumbai

मुंबईत ५८ वर्षांच्या महिलेवर बलात्कार

मुंबईत ५८ वर्षांच्या महिलेवर बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

सांताक्रूझ रेल्वे स्टेशनजवळ बुधवारी रात्री ५८ वर्षांच्या महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला माहिमहून ९.४५ च्या गाडीने निघाली. ती १०.२० वाजता सांताक्रूझ स्टेशनवर उतरली. स्टेशन बाहेर आल्यानंतर रस्त्यात दोन व्यक्तींनी त्या महिलेला अडवले आणि तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर पीडित महिलेने रिक्षा करुन थेट दिंडोशी गाठले आणि पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिडित महिलेवर गोरेगाव येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, October 4, 2013, 15:49


comments powered by Disqus