धक्कादायक: पतीच्या समोरच महिलेवर बलात्कार, woman raped in front of her husband in mumbai

धक्कादायक: पतीच्या समोरच महिलेवर बलात्कार

धक्कादायक: पतीच्या समोरच महिलेवर बलात्कार

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
घरमालकाच्या मुलाने दोन नातलगांसह भाडेकरू महिलेवर पतीसमक्ष चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार आरे कॉलनीत घडला. या घटनेनंतर तिघेही फरारी झाले असून, ते मुंबईबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.

आरे कॉलनीतल्या ३ नंबर युनिट परिसरात २५ एप्रिलला रात्री हा प्रकार घडला. पतीसमक्ष घडलेल्या अत्याचारामुळे महिलेला मानसिक धक्का बसला आहे. तिच्यावर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २६ एप्रिलला दुपारी चारच्या सुमारास तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टेरांनी ही माहिती पोलिसांना कळविली. वेलापांडी मारी अण्णा हरिजन (२६) याने दोन नातेवाइकांसोबत पीडित महिलेच्या घरात जबरीने प्रवेश केला. या वेळी घरात तिचा पतीसुद्धा होता. दोघांना चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. त्यासाठी योग्य तो मोबदला मिळेल, असेही म्हटले. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर दोघांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

शुद्ध हरपलेल्या या महिलेला पतीने जवळच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती पोलिसांना विलंबाने मिळाली. याचा फायदा घेत तिघे मुंबईबाहेर पळून गेल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर तथ्य पुढे येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 28, 2014, 14:46


comments powered by Disqus