मुंबईत बंदुक रोखून महिलेवर दोघांचा बलात्कार, woman raped in Mumbai

मुंबईत बंदुक रोखून महिलेवर दोघांचा बलात्कार

मुंबईत बंदुक रोखून महिलेवर दोघांचा बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई पुन्हा एकदा हादरी असून महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. भर दिवसा बंदुक रोखून दोघांनी 29 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. ही घटना भाईंदरमध्ये घडली.

भाईंदर परिसरात बंदुकीचा धाक दाखवत दोघांनी महिलेवर बलात्कार केला. पीडित महिला कामानिमित्ताने या दोघांना भेटली होती. ही महिला एकटीच असल्याचा फायदा उठवत भाईंदर स्थानकाजवळच महिलेला बंदुकीचा धाक दाखवत या दोघांनी या महिलेवर अत्याचार केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मे रोजी पीडीत तरूणीला नोकरी देण्याच्या बहाण्याने दोन तरूणांनी भाईंदर रेल्वे स्टेशनजवळ बोलावले. आणि तिला गाडीत बसवलं. त्यातल्या एका तरूणाने तीच्यावर पिस्तुल रोखलं, तर दुस-या तरूणाने तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर दोन्ही तरूण फरार झाले असून, पीडीत तरूणीने डी.एन.नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. सध्या या फरार आरोपींचा शोध भाईंदर नवघरचे पोलिस करत आहेत.

या घटनेप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 1, 2014, 16:58


comments powered by Disqus