Last Updated: Wednesday, February 27, 2013, 20:59
www.24taas.com,मुंबईऔरंगाबाद येथील एका पिडीत महिला कॉन्स्टेबलने विधानभवनात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद येथील एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने अत्याचार केल्याप्रकरणी ही महिला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री आऱ. आर. पाटील यांची भेट घेण्यासाठी आली होती, अशी माहिती मिळते.
विधानभवनातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महिला कॉन्स्टेबलने विष प्राशन केले. त्यानंतर ती खाली कोसळलेल्याने विधानभवन परिसरातील सुरक्षा रक्षक तिथे आले. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे महिला कॉन्स्टेबलला उचलण्यास कोणीच पुढे आले नाही. महिला कॉन्स्टेबल उपस्थित नसल्यामुळे त्यांना उचलण्यात अडचण निर्माण झाली.
विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी आपल्या गाडीतून जात असताना त्यांनी थांबून सुरक्षा रक्षकांना पिडीत महिला कॉन्स्टेबलला उचलण्याचे आदेश दिले. त्यावेळी वृत्त वाहिनीची महिला पत्रकार नेहा पुरव मदतीला धावल्यात. त्यांनंतर पिडीत महिला कॉन्स्टेबलला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.
First Published: Wednesday, February 27, 2013, 20:59