मुंबई लोकलमध्ये दबंगगिरी करणाऱ्या महिला काय सांगतात?, women Dbanggiri in Mumbai Local

मुंबई लोकलमध्ये दबंगगिरी करणाऱ्या महिला काय सांगतात?

मुंबई लोकलमध्ये दबंगगिरी करणाऱ्या महिला काय सांगतात?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रेल्वेमध्ये दबंगगिरी महिलांवर कारवाई झाली तरी आमचा काहिही दोष नाही, अशी भूमिका कारवाई झालेल्या त्या सात महिलांनी मांडली आहे. दरम्यान, पुरुषांच्या डब्यात होणारी रोजची दादागिरी आता महिलांच्या डब्यातही होत असल्याचं यानिमित्तानं उघडकीस आलं.

तक्रारदार बरखा ही उल्हासनगरहून रोज उलटा प्रवास करुन अंबरनाथ लोकलनं अंबरनाथला येते. आधीच प्रथम श्रेणीच्या डब्यात १४ सीट असतात. त्यामुळे सर्वजण उलटा प्रवास करुन आले तर अंबरनाथ प्रवाशांना जागा कशी मिळणार, असा सवाल त्यांनी केला आहे.

मुंबईच्या लोकल डब्यांमध्ये महिला ग्रुपच्या चालणाऱ्या दादागिरीविरोधात एका तरुणीनं आवाज तर उठवलाच शिवाय त्यांना न्यायालयात खेचून धडा शिकवला. बरखा मेघानी असं या तरुणीचं नाव असून ती उल्हासनगरची रहिवासी आहे.

अंबरनाथ स्टेशनवरुन रोज सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी सुटणाऱ्या लोकलमधल्या मिडल फर्स्ट क्लासच्या डब्यात सात महिलांचा एक ग्रुप आहे. जो बरखाला बसण्याच्या जागेवरुन रोज त्रास देत असे. महिनाभर हा त्रास सहन केल्यानंतर बरखानं अखेर रेल्वे पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत रेल्वे पोलिसांनी सात महिलांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं. कोर्टानं या सात महिलांना प्रत्येकी एका हजारांचा दंड ठोठावून दिवसभर पोलीस ठाण्यात थांबवून ठेवलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Friday, November 1, 2013, 15:23


comments powered by Disqus