बॅंकांचे आजच व्यवहार करा, तीन दिवस बंद, worker strikes, closing bank behavior

बॅंकांचे आजच व्यवहार करा, तीन दिवस बंद

बॅंकांचे आजच व्यवहार करा, तीन दिवस बंद
www.24taas.com,मुंबई

तुम्हाला पैसे काढायचे आहेत का? किंवा बॅंकेची काही कामे असतील तर उद्यावर ढकलू नका. आज करा. कारण मंगळवार म्हणजे उद्याची शिवजयंती आणि बुधवार, गुरुवारी पुकारलेला संप. यामुळं तीन दिवस बँकांचे व्यवहार ठप्प राहणार आहेत.

बँकांचे व्यवहार ब्लॉक होणार असल्यानं बुधवारी किंवा गुरुवारी ज्यांना बँकेचे व्यवहार करायचे आहेत. त्यांना आजच व्यवहार उरकावे लागणार आहेत. केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात राष्ट्रीय बँकांच्या कर्मचारी संघटनाही सहभागी होणार आहेत.

नऊ संघटनांचा समावेश असलेल्या फोरम ऑफ बँक युनियनने देशव्यापी संपात सहभागी होणार असल्याचं सांगितलयं. त्यामुळं देशातले बँक व्यवहार मंदावणार आहेत. यावर उपाय म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियानं आज बँकेच्या कामकाजाची वेळ दोन तासांनी वाढवलीये. तीन दिवसांच्या ब्लॉकमध्ये बँक ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी हे उपाय करण्य़ात आलेत.

First Published: Monday, February 18, 2013, 10:04


comments powered by Disqus