टीव-टीवमुळं चेतन भगत गोत्यात! Writer Chetan Bhagat again in Controversy, he Compared Rupee fall down with Ra

टीव-टीवमुळं चेतन भगत गोत्यात!

टीव-टीवमुळं चेतन भगत गोत्यात!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

“रुपया म्हणतोय, माझ्यावर बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा होणार की नाही?” अशा स्वरुपाचं ट्विट करुन प्रसिद्ध लेखक चेतन भगत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याचं पाहून चेतन भगत यांनी ट्विट करुन रुपयाची तुलना बलात्काराशी केली. या ट्विटबाबत सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली. त्यामुळं अखेर चेतन भगत यांनी वादग्रस्त ट्विट डिलिट केलं.

सोशल नेटवर्कवर मतप्रदर्शन करताना जबाबदारीचं भान ठेवून योग्य भाषेचा उपयोग करावा, असं चेतन भगत यांचे विरोधक म्हणतायेत. तर ट्विटमागील भावना समजून घ्या, असं समर्थक उत्तर देत आहेत. सोशल नेटवर्किंग साईट्सवरच आता हा वाद रंगलाय. काही जण चेतन भगत यांना पाठिंबा देत आहेत. तर काही त्यांचा निषेध करत आहेत.

तर चेतन भगत यांनी माफी मागावी, अशी मागणी महिलांसाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संघटनांनी केलीय.

एकूणच काय तर नेटकऱ्यांमध्ये चेतन भगत यांच्या टीव-टीवमुळं युद्धच रंगलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 29, 2013, 12:42


comments powered by Disqus