सलमान खानला पोलीस पाठिशी का घालतायेत, कारवाई करा, Y.P.Singh on Salman Khan

सलमानला पाठिशी घालतायेत पोलीस

सलमानला पाठिशी घालतायेत पोलीस
www.24taas.com, मुंबई

निवृत्त सनदी अधिकारी वाय. पी. सिंग यांनी अभिनेता सलमान खान याच्यावर टीका केली आहे. सलमानच्या हिट रन प्रकरणी अनेक निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले होते. आणि त्यामुळे सलमान खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र या गुन्ह्यामध्ये सलमान खानवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये... आणि त्यामुळेच आता वाय वाय.पी. सिंग यांनी मुंबई पोलिसांवर देखील हल्लाबोल केला आहे. सलमान खान हिट रन केसप्रकरणी पोलीसांचे सलमानला अभय मिळत असल्याचा आरोप वाय.पी.सिंह यांनी केला आहे.

कोर्टाने आदेश दिल्यानंतरही सलमान खान कोर्टात तब्बल ८२ वेळा गैरहजर राहिला आहे. आणि तरीही पोलिसांकडून कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाहीये.. सलमानने केलेला गुन्हा गंभीर असल्याने त्यावर त्वरीत कारवाई केली जावी अशीही मागणी वाय.पी.सिंग यांनी केली आहे.


First Published: Friday, November 2, 2012, 17:24


comments powered by Disqus