जुहूत तरुणीची `ऑनलाईन` आत्महत्या!, young girl online suicide in juhu

जुहूत तरुणीची `ऑनलाईन` आत्महत्या!

जुहूत तरुणीची `ऑनलाईन` आत्महत्या!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतील जुहू परिसरात एका २५ वर्षीय तरुणीनं ऑनलाईन आत्महत्या केल्याची घडलीय. ती आत्महत्या करताना तिचा प्रियकर तरुण ही घटना वेबकॅमच्या साहाय्यानं स्वत:च्या डोळ्यांनी पाहत राहिला पण तिला थांबविण्यासाठी तो असमर्थ ठरला.

शोभना असं मृत तरूणीचं नाव आहे. रात्री आपल्या ऑनलाईन चॅटींग करत असताना तिचा प्रियकराशी वाद झाला. रागाच्या भरात तिनं प्रियकराला मी आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आणि वेबकॅमसमोरच तिनं फॅनला ओढणी अडकवली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.

शोभना आत्महत्या करत असल्याचं तिच्या प्रियकरानं तिच्या बहिणीला फोन करूनही कळवलं. शोभनाला थांवबण्याची विनंतीही त्यानं केली. मात्र तिची बहीण घटनास्थळी पोहचेपर्यंत शोभनानं आत्महत्या केली होती.

दरम्यान, शोभनाचं शव शवविच्छेदनासाठी पाठवला असून तिनं नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली? याचा पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांनी शोभनाचा लॅपटॉप, मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. या तपासासाठी पोलिस आता सायबर सेलची मदत घेणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 23, 2013, 10:03


comments powered by Disqus