१७ वर्षांच्या शेजाऱ्याने केला ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार!, 17 years old neighbour rapes 7 years old girl

१७ वर्षांच्या शेजाऱ्याने केला ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार!

१७ वर्षांच्या शेजाऱ्याने केला ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार!
www.24taas.com, झी मीडिया,नागपूर

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना काय शिक्षा होणार याकडे सध्या सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. त्याचवेळी नागुपरातही बलात्काराची एक घटना उघडकीस आलीय. या प्रकरणातली अत्याचारीत मुलगी केवळ 7 वर्षांची असून आरोपी 17 वर्षांचा आहे. या अल्पवयीन आरोपीनं आपल्या शेजारी राहणा-या चिमुरडीवर बलात्कार करत या आरोपीनं शेजारधर्मालाच तडा दिलाय.

शेजारधर्म आणि माणुसकीच्या नात्याला या १७ वर्षाच्या मुलानं काळीमा फासलाय.हिंगणा तालुक्यातल्या जोगेश्वरी पुरी भागात अत्याचारग्रस्त मुलगी आणि आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून शेजारी होते. ती मुलगी अतिशय विश्वासानं आरोपीच्या घरी खेळायला जात असे. त्या दिवशी देखील सात वर्षांची चिमुरडी या आरोपीच्या घरी नेहमीप्रमाणेच गेली होती.

आपल्या घरात कुणीच नाही हे बघताच या आरोपीच्या मनाताला सैतान जागा झाला. त्यानं तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार ग्रस्त मुलीच्या आईनं याबाबत केलेल्या तक्रारीनंतर या नराधमाला अटक करण्यात आलीय.


माणुसकीला काळीमा फासणा-या या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडालीय. या प्रकरणातल्या आरोपीला तातडीनं शिक्षा करण्याची मागणी करण्यात येतीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 11, 2013, 19:00


comments powered by Disqus