छेडछाडीबाबत जाब विचारला, तरूणाला घातली गोळी, 2 Firing in nagpur in last six hours

छेडछाडीबाबत जाब विचारला, तरूणाला घातली गोळी

छेडछाडीबाबत जाब विचारला, तरूणाला घातली गोळी
www.24taas.com, नागपूर

नागपुरात अवघ्या ६ तासांत २ गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आहेत. बहिणीच्या छेडछाडीचा जाब विचारण्याला गोळी घातल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे बाईकवरुन ट्रीपलसीट जाणा-यांना हटकणा-या पोलिसांवरच बाईकस्वारांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात एक पोलीस जखमी झाला आहे.

बहिणीच्या छेडछाडीस विरोध करणा-यावर गोळीबार करण्यात आला. यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या छेडछाडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपुरात ६ तासांत गोळीबाराच्या २ घटना घडल्या.

नागपुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणा झाला आहे. छेडछाडीबाबत जाब विचारला असता तरूणावर हल्ला करण्यात आला आणि त्यातच तरुणाचा गोळीबारात मृत्यू झाला.

First Published: Thursday, April 18, 2013, 11:11


comments powered by Disqus