नागपूरात २४ तासांत २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार 2 minors raped withing last 24 hours in Nagpur

नागपूरात २४ तासांत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

नागपूरात २४ तासांत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
www.24taas.com, नागपूर

नागपुरात 24 तासात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना उघडकीस आलंय. त्यातल्या दोन्हीही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

नागपुरात पोलिसांचा वचक राहिलाय की नाही? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण नागपूरच्या ग्रामीण परिसरात 24 तासांच्या आत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. बुटीबोरी वसाहतीत राहणा-या चार वर्षांच्या मुलीवर तिच्याच शेजारी राहणा-या 45 वर्षांच्या शेरुसिंग जाट या नराधमानं बलात्कार केला. चॉकलेट देण्याच्या बहाण्यानं त्यानं चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर मुलीला घराशेजारी सोडून पसारही झाला. मुळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी असलेल्या शेरुसिंगला अटक करण्यात आलीय.

दुसरी घटना हिंगणा तालुक्यातल्या सावंगी देवली इथं घडली आहे. सात वर्षांच्या मुलीवर त्याच गावातल्या आकाश दडमल या 19 वर्षाच्या नराधमानं बलात्कार केला. पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसह पाणी भरायला जात होती त्यावेळी आरोपी आकाश दडमल तिला मोसंबी देण्याच्या बहाण्यानं घेऊन गेला आणि मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकाशला अटक केली.

दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर जागृती झाली. मात्र तरीही अशा अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे एकीकडे जागृती होत असली तरी नराधमांच्या विकृतीचं काय ? असा सवाल निर्माण होतोय.

First Published: Thursday, February 7, 2013, 17:41


comments powered by Disqus