२८ वर्षीय महिलेने केली चिमुरड्यासह आत्महत्या, 28th year old lady suicide

२८ वर्षीय महिलेने केली चिमुरड्यासह आत्महत्या

२८ वर्षीय महिलेने केली चिमुरड्यासह आत्महत्या
www.24taas.com, नागपूर

नागपुरात एका २८ वर्षीय विवाहित महिलेनं आपल्या ८ वर्षाच्या मुलासह स्वत:ला जाळून घेतल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. शैलेशनगर परिसरात घडलेल्या या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव निशा काटोले असून तिच्या मुलाचे नाव स्वयम काटोले आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी निशा काटोलेने सुसाइड नोट लिहिली असून त्यात आपल्या आत्महत्येबाबत कुणालाही जबाबदार धरु नये असं लिहिलंय. परंतु याबाबत पोलिसांना तिचा नवरा मनोज कटोलेविषयी संशय आहे. राज्य राखीव पोलीस दलात प्रशिक्षणाकरता गेल्याचं जरी मनोज काटोलेनं सांगितलं असलं तरी तो तिथं नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

सुसाइड नोट लिहिण्याच्या पद्धतीबद्दलही पोलीस समाधानी नाहीत. शिवाय जळताना निशा किंवा तिच्या मुलाचा आवाज कसा आला नाही हेदेखील पोलिसांना कोडं पडलंय.


First Published: Friday, November 2, 2012, 19:13


comments powered by Disqus