Last Updated: Tuesday, April 30, 2013, 12:43
www.24taas.com, झी मीडिया, नागपूरमध्य प्रदेशातल्या सिवनीमध्ये बलात्कार झालेल्या ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय. नागपूरच्या केअर रुग्णालयात तिचा मृत्यू झालाय. आज नागपूरच्या शासकिय रूग्णालयात या चिमुरडीचं पोस्ट मॉर्टम केलं जाणार आहे. पोस्ट मोर्टेम झाल्यावर तीचं पार्थिव तिच्या परिवारच्या स्वाधीन केले जाईल.
२० एप्रिलला तिला नागपूरमध्ये आणण्यात आलं होतं. गेले १० दिवस इथल्या डॉक्टरांनी या चिमुरडीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले... उपचारादरम्यान तिचा रक्तदाब कमी झाला, तिच्या मेंदूला कधी दुरुस्त न होणारी जखम झाल्याचे डॉक्टरांना लक्षात आले आणि तिला श्वास घेत येत नव्हता म्हणून तिला कृत्रिमरित्या श्वासोश्वास दिला गेला.
डॉक्टरांनी केलेले प्रयत्न मात्र निष्फळ ठरले.... १० दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या सिवनीच्या या गुडियाने सोमवारी संध्याकाळी ७.४५ वाजता या जगाचा निरोप घेतला.
First Published: Tuesday, April 30, 2013, 12:43