आयकर चोरून `आदर्श`मध्ये फ्लॅट पडला महाग aadarsha flat and income tax

आयकर चोरून `आदर्श`मध्ये फ्लॅट पडला महाग

आयकर चोरून `आदर्श`मध्ये फ्लॅट पडला महाग
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

वादग्रस्त आदर्श प्रकरणात आणखी एक प्रकरण समोर आलं आहे.

नागपुरातील व्यक्तीने आयकर चोरून मुंबईतल्या वादग्रस्त आदर्श इमारतीत ६0 लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे.

हा छत्तीसगडला एका खासगी विमा कंपनीत सहायक व्यवस्थापकपदावर कार्यरत आहे.

आयकर विभागाने या व्यक्तीवर एकूण ३२ लाख २५ हजार रुपये आयकर आकारला आहे.

आदर्श बिल्डिंगचा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर या व्यक्तीचेही ग्रह फिरले आणि आयकर विभागाची वक्रदृष्टी त्याच्याकडे वळली.

बोरा यांनी सॅन फायनान्समध्ये २००५-०६ व २०११-१२ मध्ये एकूण ९७ लाख ६९ हजार रुपये जमा केले, आणि फ्लॅट खरेदी करण्यासाठी ६0 लाख ९१ हजार ९३ रुपयांचे कर्ज घेतले. त्यांनी कधीच आयकर भरला नाही.

आयकर विभागाने वारंवार नोटीस पाठवूनही त्यांना काहीही उत्तर दिले नाही.

१ ऑक्टोबर २0१२ रोजी सॅन फायनान्सने बोरा यांनी कर्ज परत केले नाही म्हणून त्यांची उर्वरित ६६ लाख ७१ हजार ५१५ रुपयांची रक्कम सामावून घेतली. यानंतर आयकर विभागाने सॅन फायनान्सला नोटीस पाठवून बोरा यांचा ३२ लाख २५ हजार रुपये आयकर भरण्यास सांगितले.

शेवटी १५ ऑक्टोबर रोजी आयकर विभागाने सॅन फायनान्सचे खाते जप्त करून पंजाब नॅशनल बँकेला बोराद्वारे देय असलेले ३३ लाख ९६ हजार ३१६ रुपये (व्याजासह) कपात करण्याचे निर्देश दिलेत.

याविरुद्ध कंपनीचे संचालक आनंद संचेती यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता सॅन फायनान्स आणि राजेश बोरा यांना ६ मार्च रोजी आयकर विभागाच्या नागपूर कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आणि आयकर विभागाच्या सक्षम अधिकार्‍याने सॅन फायनान्सच्या आक्षेपांवर पुढील तीन आठवड्यांत कायद्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देशही दिले आहेत.

तेव्हापर्यंत ३३ लाख ९६ हजार ३१६ रुपयांची जप्ती कायम राहणार आहे. निर्णय विरोधात गेल्यास कंपनीला एक आठवड्यात सक्षम अधिकार्‍याकडे दाद मागण्याचे स्वातंत्र देण्यात आले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 4, 2014, 20:43


comments powered by Disqus