Last Updated: Tuesday, May 28, 2013, 07:28
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अकोल्यातील जमनालाल गोयंका डेंटल कॉलेज अँण्ड हॉस्पिटल या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. याबाबत झी २४ तासने आवाज उठवला होता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी झी २४ तासने प्रकरण लावून धरले होते.
गोयंका डेंटल कॉलेजमध्ये २०११-२०१२ या शैक्षणिक वर्षी प्रवेश घेतलेल्या ४० विद्यार्थ्यांची महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठांशी संग्लन असलेल्या अन्य खासगी दंत महाविद्यालयात बदली करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. गोयंका डेंटल कॉलेजला मान्यता नसल्याने ४० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले होते. तर खुद्द न्याय मागण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी लाखोली वाहून विद्यार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला होता.
अजित पवारांनी असभ्य भाषेत शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता राष्ट्रवादीचेच नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबतचे फुटेच झी २४ तासने दाखविले होते. तसंच विद्यार्थ्यांचे काय म्हणणे होते, याला वाचा फोडली.
अकोल्याच्या गोयंका डेंटल कॉलेजचे विद्यार्थी आणि पालक त्यांच्या तक्रारी घेऊन विजयकुमार गावित यांच्याकडे गेले होते. या विद्यार्थ्य़ांना दिलासा देण्याऐवजी गावित यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. कॉलेज व्यवस्थापनाकडून होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी गेलेल्या विजयकुमार गावित यांनी विद्यार्थी आणि पालकांची तक्रार ऐकूण घेण्य़ाऐवजी त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणमंत्री पदावर बसलेल्या या विजयकुमारांची शिव्यांची लाखोली कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर शासनाचे डोळे उघडले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 28, 2013, 07:20