फेसबुकवरुन बनला `तो` तोतया IPS अधिकारीArrested Fake IPS officer in Jalgaon

फेसबुकवरुन बनला `तो` तोतया IPS अधिकारी

फेसबुकवरुन बनला `तो` तोतया IPS अधिकारी
www.24taas.com, झी मीडिया, जळगाव

सोशल मीडियामुळं कशी फसगत होऊ शकते याचा एक धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीला आलाय. दीपस्तंभ फाउंडेशन या स्पर्धा परीक्षाचं मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी मागर्दर्शनाकरता आयकॉन म्हणून आमंत्रित केलेला व्यक्ती चक्क तोतया आयपीएस अधिकारी निघाला. व्यासपीठावर हजर असलेले शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विश्वजित काईगडे यांच्या सतर्कतेमुळं हा प्रकार उघड झालाय.

सोशल मीडियाचा आधार घेत दीपस्तंभ फाउंडेशननं फेसबुकवर आयपीएस अधिकारी म्हणून प्रोफाईल असलेल्या हेमंत खाडे या आयपीएस अधिकाऱ्याला व्याख्यानासाठी आमंत्रित केलं. मात्र जेव्हा हा आयकॉन मार्गदर्शन करायला उभा राहिला तेव्हा तिथं हजर असलेले शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे यांना पाहून त्याची ततफफ उडाली. खाडे याच्या उलटतपासणीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्याला थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागली. तो मुळचा आळंदीचा असून त्याचं खरं नाव हनुमंत आहे. केवळ मानसन्मानासाठी त्यानं हे कृत्य केल्याचं तो म्हणतोय. विशेष म्हणजे त्याने ५ ते ६ ठिकाणी अशी व्याखानं दिलीय. इतकाच काय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खाडे याचा सत्कारही केल्याचं कळतंय.

विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आयकॉन बोलावले जातात मात्र क्लासेस चालक कोणतीही शहानिशा न करता अशा तोतया अधिकाऱ्यांना आमंत्रित करत विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात. पण यापुढं अशी चूक होणार नाही अशी कबुली दीपस्तंभ फाउंडेशननं दिलीय.

ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी मोठ्या आशेनं हजारो रुपये खर्च करून क्लासेसला अडमिशन घेतात. मात्र त्याचा गैरफायदा घेत क्लासेस चालक भोळ्या भाबड्या विद्यार्थ्यांची फसवणूक करतात. अशी गंभीर चूक करून क्लासेसचालक कान धरून मोकळे होतात मात्र याबाबत आता विद्यार्थ्यांनीच सतर्क राहण्याची गरज आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा व्हिडिओ




First Published: Thursday, February 6, 2014, 10:59


comments powered by Disqus