‘आशान्ना’ गडचिरोलीत... हायअलर्ट जारी!, ashanna in gadchiroli... police on high alert

‘आशान्ना’ गडचिरोलीत... हायअलर्ट जारी!

‘आशान्ना’ गडचिरोलीत... हायअलर्ट जारी!
www.24taas.com, गडचिरोली

मोस्ट वॉन्टेड आणि जहाल नक्षलवादी आशान्ना याचा गडचिरोली परिसरात वावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. आशान्ना हा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय मिलिट्री समितीचा सदस्य आहे.

नक्षलवाद्यांच्या केंद्रीय मिलिटरी समितीचा सदस्य असलेला आशान्ना गडचिरोलीत लपून बसलाय. ‘आशान्ना’ उर्फ थवकलपल्ली वासुदेव राव उर्फ सुजित असे या नक्षलवाद्याचे नाव आहे. मुळचा आंध्रातील ‘वारंगल’चा रहिवासी असलेला आशान्ना आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर २००३ साली तिरुपतीमध्ये झालेल्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी आहे. त्याच्यावर आंध्र सरकारनं एक लाखाचं इनामही जाहीर केलेलं आहे. दोन आयपीएस अधिकारी आणि एका आमदाराच्या खुनाचा त्याच्यावर आरोप आहे.

आशान्ना गडचिरोलीच्या भागात दिसल्याची माहिती मिळाल्यानं पोलीस हायअलर्टवर आहेत. अन्य साथीदारांसह गडचिरोलीत मोठा घातपात घडवण्याचा त्याचा कट तर नाही ना असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यामुळं हायअलर्ट जारी करण्यात आलाय. पोलिसांनी नागरिकांनाही सहकार्याचं आणि सतर्कतेचं आवाहन केलंय.

First Published: Wednesday, January 9, 2013, 12:23


comments powered by Disqus