एटीएमने पेट्रोल भरणे पडले महाग, कार्ड केले स्कॅन , ATM petrol filling was expensive, scan the card

एटीएमने पेट्रोल भरणे पडले महाग, कार्ड केले स्कॅन

एटीएमने  पेट्रोल भरणे पडले महाग, कार्ड केले स्कॅन
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना एटीएम कार्डने पैसे दिलेल्या अनेक ग्राहकांना एनआयटी इंजनिअरिंगच्या विध्यार्थ्याने लुटल्याची घटना नागपूरमध्ये घडली.

मनजीत सिंग असे या आरोपीचे नाव असून तो मुळचा पंजाब येथील राहिवासी आहे. महत्वाचे म्हणजे या घटनेत वापरण्यात आलेली एटीएम स्कॅनिंग मशीन चीन मधून मागविली होती. त्या मशिनद्वारे तो पेट्रोलपंप कर्मचा-यांच्या मदतीने ग्राहकाचे एटीएम कार्ड स्कॅन करायचा. ग्राहकांच्या तक्रारी नंतर अंबाझरी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. याप्रकरणी दोन आरोपीला अटक झालीये.

पेट्रोलपंप वरील कर्मचारी गणेश सोनकुवर ग्राहकांच्या एटीएम कार्डचे पिन कोड चुपचाप बघून घेत असायचा. तसेच त्याच्याच खिशात असलेली एटीएम स्कॅनिंग मशीनवर एटीएमचा डाटा पण स्कॅन व्हायचा. जमा झालेला डाटा आणि पिन कोड गणेश सोनकुवर मुख्य आरोपी मनजित सिंगला देत असे. त्या बदल्यात सोनाकुवरला प्रती ग्राहक ५०० रुपये मिळत असे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 4, 2014, 09:21


comments powered by Disqus