Last Updated: Monday, August 20, 2012, 08:34
www.24taas.com, चंद्रपूरअवैध धंद्यांविरोधात मोहिम राबवणाऱ्या पोलिसांवरच स्थानिक जमावानं हल्ला केल्याची घटना चंद्रपुरात घडलीय.
पोळा सण विदर्भात मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येतो. या सणानिमित्त ठिकठिकाणी पैजा लावत जुगार खेळला जातो. अशाप्रकारे चंद्रपुरातल्या नेहरुनगर परिसरात जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकताच जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं. त्यावेळी परिसरातील पुरुष आणि महिलांनी पोलीस पथकावर हल्ला केला. इतकंच नाही तर पोलीस वाहनांवर दगडफेक करत पोलिसांच्या ताब्यातील आरोपींची सुटकाही या जमावानं केली.
या घटनेनंतर परिसरात अशांततेचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर ज्यादा कुमक मागवत परिसरात शांतता निर्माण करण्यात पोलिसांना यश आलं. शोधमोहीम राबवून जुगारी व्यक्ती आणि हल्लेखोरांसह २४ जणांना अटक करण्यात आलीय. यांत ११ महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी सुमारे ४० हजार रुपयांची रोकड जप्त केलीय. अटक करण्यात आलेल्या सगळ्यांना २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
First Published: Monday, August 20, 2012, 08:32